एक्स्प्लोर
Indian Team Update : भारतीय संघाचा अनोखा सराव, प्रमुख गोलंदाजांना फलंदाजीच्या सरावाची संधी
अष्टपैलू हार्दिक पंड्याला झालेली दुखापत आणि त्याला विश्वचषकातल्या लागोपाठ दोन साखळी सामन्यांमधून घ्यावी लागलेली माघार भारतीय संघासाठी चिंतेची बाब ठरली आहे. कारण हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात एका अस्सल अष्टपैलूची उणीव प्रकर्षानं जाणवली. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर एकाच ताकदीनं खेळू शकणारा पर्यायी शिलेदार सध्या तरी भारतीय संघात नाही. त्यामुळं लखनौमुक्कामी भारतीय संघानं बिनीचे फलंदाज आणि प्रमुख गोलंदाज यांच्या भूमिकेत अदलाबदल करून सराव करण्यासाठी पसंती दिली. पाहूयात क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांचा रिपोर्ट.
आणखी पाहा


















