IND vs Aus Final ICC World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाचे 'हे' शिलेदार भारताची डोकेदुखी ठरणार?
विश्वचषकाच्या महायुद्धातल्या निर्णायक लढाईसाठी आज अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम सज्ज झालंय. इंग्लंड आणि न्यूझीलंड संघांमधल्या सलामीच्या लढाईनं विश्वचषकाच्या मोहिमेला पाच ऑक्टोबर रोजी याच स्टेडियममधून सुरुवात झाली होती. आणि आता विश्वचषक मोहिमेच्या सांगतेला भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या फौजा अहमदाबादच्या रणांगणात आमनेसामने उभ्या ठाकल्या आहेत. वन डे क्रिकेटच्या इतिहासात भारतानं आजवर १९८३ आणि २०११ साली विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे. तसंच ऑस्ट्रेलियानं १९८७, १९९९, २००३, २००७ आणि २०१५ साली विश्वचषकाचा मान मिळवला आहे. योगायोगाची बाब म्हणजे विश्वचषकाच्या महायुद्धात यंदा तब्बल वीस वर्षांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत पुन्हा निर्णायक लढाई होणार आहे.


















