Virat Kohli : चाहत्यांना BCCI चं 'विराट' गिफ्ट, मोहालीत गुंजणार 'किंग कोहली'चा जयघोष!
भारत-श्रीलंका दरम्यान शुक्रवारपासून कसोटी मालिकेला सुरुवात होतेय. मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर हा सामना होणार आहे. ही कसोटी विराट कोहलीच्या कारकिर्दीतील हा शंभरावा कसोटी सामना असून तो प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळवला जाणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ही माहिती दिलीय. सुरुवातीला हा सामना प्रेक्षकांविना खेळवण्यात येणार होता. मात्र कोहलीचा हा शंभरावा कसोटी सामना असल्याने प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळवला जावा अशी मागणी विराटच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर केली जात होती. अखेर चाहत्यांच्या मागणीपुढे बीसीसीआय झुकलं असून ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.























