Sarabjot singh Exclusive : सरबज्योत सिंगची अनोखी कहाणी; जिद्दीने जिंकलं ऑलिम्पिक मेडल
Sarabjot singh Exclusive : सरबज्योत सिंगची अनोखी कहाणी; जिद्दीने जिंकलं ऑलिम्पिक मेडल
हेही वाचा : भारताच्या मनू भाकरने (Manu Bhaker) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजीच्या अंतिम फेरीत भारतासाठी पहिलं कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. नेमबाजीच्या अंतिम फेरीत जिंकण्यासाठी भगवान कृष्ण आणि भगवद्गीतेच्या शिकवणीने कशी मदत केली, हे मनुने उघड केलं. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. मनु भाकरने चॅटॉरॉक्स नेमबाजी केंद्रावर झालेल्या अंतिम फेरीत 221.7 गुणांसह तिसरं स्थान पटकावलं आहे. भगवद्गीतेने मनुला मदत कशी केली? पहिलं ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर बोलताना मनु म्हणाली, श्रीकृष्ण आणि भगवद्गीतेच्या शिकवणीने तिला अंतिम फेरीत तिचं डोकं शांत ठेवण्यात आणि पॅरिस गेम्समध्ये भारत देशासाठी पहिलं पदक जिंकण्यास मदत केली. मनु गीतापठण खूप करते. तणावपूर्ण फायनल दरम्यान तिच्या मनात काय चाललं होतं याबद्दल बोलताना मनु म्हणाली, तिला महाभारताच्या वेळी भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितलेले शब्द आठवले आणि तिचं लक्ष फक्त त्या मार्गावर होतं. 'कर्म पे ध्यान दो, फल की चिंता मत करो' तुम्ही तुमचं काम करत राहा, फळाची चिंता करू नका, असं महाभारताच्या काळात श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं होतं. मनुने याच शिकवणीचं अनुसरण केलं. मनु भाकरने स्पष्ट केलं की, तिला निकालाची चिंता नव्हती आणि तिला अंतिम फेरीदरम्यान फक्त तिच्या कर्मावर लक्ष केंद्रित करायचं होतं. पुढे मनु म्हणाली, "स्पर्धेच्या रात्री मला शांत झोप लागली. कारण पदक मिळेल की नाही, याचा मी विचार करत नव्हते. आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. हिंमत सोडायची नाही, एवढाच मी मनाशी निश्चय केला होता."