Jasprit Bumrah दुखापतीमुळे T- 20 World Cup ला मुकणार? दीपक चहरला संधी मिळण्याची शक्यता
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा पाठीच्या दुखापतीमुळं ऑस्ट्रेलियातल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाला मुकण्याची शक्यता आहे. तो युएईतल्या आशिया चषकात खेळू शकला नव्हता. पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ट्वेन्टी सामन्यांमध्ये पुनरागमन करून त्यानं आपला फिटनेस सिद्ध केला होता. पण बुमराच्या पाठदुखीनं उचल खाल्ल्यामुळं, त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्याला मुकावं लागलं. ऑस्ट्रेलियातल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाला १६ ऑक्टोबरपासून सुरुवात होत असून, बुमरानं या विश्वचषकातून माघार घेतली तर त्याच्याऐवजी दीपक चहरचा भारतीय संघात समावेश होण्याची शक्यता आहे.























