एक्स्प्लोर
T20 WC 2021 : भारतीय क्रिकेट संघाच्या चिंतेत वाढ, फलंदाजी करताना हार्दिक पंड्याला दुखापत
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान दुखापत झाली आहे. फलंदाजी करताना हार्दिकचा खांदा दुखावला आणि त्यामुळे क्षेत्ररक्षणासाठी हार्दिक मैदानात उतरलाच नाही. त्यामुळे त्याच्याजागी संपूर्ण डावात ईशान किशननं क्षेत्ररक्षण केलं. दरम्यान सामन्यानंतर हार्दिकला चाचणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण या चाचणीचा अहवाल अद्याप आलेला नाही.
आणखी पाहा























