IND Vs AUS : टी 20 विश्वचषकात भारत विरूद्ध ऑस्टेलिया सामना! टीम इंडियाकडून आक्रमक खेळीची अपेक्षा
IND Vs AUS : टी 20 विश्वचषकात भारत विरूद्ध ऑस्टेलिया सामना! टीम इंडियाकडून आक्रमक खेळीची अपेक्षा
सीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर 8 चा थरार अंतिम टप्प्यात आहे. बी ग्रुपमधून इंग्लंड पाठोपाठ आता दक्षिण आफ्रिकेने सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यानंतर आता आज 24 जून रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात सामना होणार आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून सेमी फायनलमध्ये पोहचण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियासाठी हा करो या मरो असा सामना आहे. ऑस्ट्रेलिया पराभूत झाल्यास त्यांचं आव्हान संपुष्टात येईल. तर इथे ऑस्ट्रेलियाचा पराभव झाल्यास डेव्हिड वॉर्नरचा अखेरचा टी 20 सामना ठरेल, कारण त्याने आधीच वनडे-टेस्ट निवृत्तीनंतर टी 20 वर्ल्ड कप 2024 नंतर क्रिकेटला रामराम करणार असल्याचं म्हटलं होतं.























