एक्स्प्लोर
India vs South Africa 3rd ODI : टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर 78 धावांनी विजय
India vs South Africa 3rd ODI Match Score: भारतीय क्रिकेट संघानं (Indian Cricket Team) दक्षिण आफ्रिकेत (South Africa) इतिहास रचला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात टीम इंडियानं 78 धावांनी विजय मिळवला. यासह केएल राहुलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघानं आफ्रिकेला त्याच्या घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिकेत 2-1 नं पराभूत केलं. या सामन्याचा हिरो संजू सॅमसन होता, त्यानं शानदार खेळी करत शतक झळकावलं. यानंतर भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेला लक्ष्याचा पाठलाग करूच दिला नाही. या विजयासह टीम इंडियानं इतिहास रचला
आणखी पाहा























