VIDEO | पवार कुटुंबीय मोदींच्या रडारवर? | माझा विशेष | एबीपी माझा
पवारांचं बोट धरुन राजकारणात आल्याची भाषा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपले गुरु शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मोदी यांनी आज वर्ध्यातून महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी काँग्रेससह शरद पवार आणि अजित पवार यांच्यावरही सडकून टीका केली. पवार कुटुंबात सध्या गृहकलह सुरु असून, शरद पवारांचे पुतणे पक्षावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला मोदींनी लगावला. इतकच नाही तर अजित पवार यांच्या दुष्काळातील वादग्रस्त विधानाचा उल्लेख करत, मावळच्या घटनेची आठवणही मोदींनी उपस्थितांना करुन दिली. पवार यांनी राजकारणाची हवा ओळखूनच माढ्यातून माघार घेतली असल्याचा टोला त्यांनी लगावला. याविषयी आपण माझा विशेष या कार्याक्रमातील चर्चा पाहू.

















