एक्स्प्लोर
Yavatmal : यवतमाळमधील नेर तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, जमिनी गेल्या खरवडून
यवतमाळच्या नेर तालुक्यातील काही गावांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय. पावसामुळं शेतातील पीकं आणि माती वाहून गेलीय, त्यामुळं बियाणे घ्यायला पैसे आणायचे कुठून आणि पेरायला मातीच नाही तर पेरायचे कसं असा प्रश्न नेर तालुक्यातील शेतकऱ्यांना पडलाय. सावरगाव, गोळेगाव , ब्राह्मनवाडा, शिरजगाव, पांढरी, पिंपळगाव काळे शिवारातील जवळपास 114 हेक्टर जमिनीवरील पिकं पूर्णतः उध्वस्त झाल्याचा अंदाज आहे. साखळी नदीला जोडणारा नाला फुटल्यानं त्याचं पाणी शेतात शिरून पीकं वाहून गेली आहेत. प्रशासनाकडून अद्यापही नुकसानीचे पंचनामे झाले नसून शेतकरी पुरता हतबल झालाय..
आणखी पाहा























