एक्स्प्लोर
Afghanistanमध्ये ISISच्या ठिकाणांवर अमेरिकेकडून ड्रोन हल्ला,काबूल विमानतळांवरील स्फोटानंतर कारवाई
अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेनं ड्रोन हल्ला करून काबूल विमानतळावर स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांना काही तासांच्या आत धडा शिकवला. स्फोटाचं षडयंत्र रचणाऱ्यांना मारल्याचा दावा अमेरिकेनं केलाय. काबूल विमानतळावर गुरुवारी आयसिस के या दहशतवादी संघटनेनं स्फोट घडवला आणि त्यात अमेरिकेच्या १३ सैनिकांसह १७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर अमेरिकेनं काही तासांच्या आत अफगाणिस्तानातील नंगरहार प्रांतात ड्रोन हल्ला चढवला आणि स्फोटाचा डाव रचणाऱ्यांचा खात्मा केला. नंगरहार प्रांत पाकिस्तानच्या सीमेजवळ आहे. दरम्यान, काबूलमध्ये आणखी एक स्फोट घडवला जाण्याची शक्यता अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेनं वर्तवली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















