Rishi Soonak : ब्रिटनचे पंतप्रधानपदाचे उमेदवार ऋषी सूनक यांचा अक्षता मूर्तीसोबत गोपूजन
ब्रिटनचे पंतप्रधानपदाचे उमेदवार ऋषी सुनक यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ऋषी पत्नी अक्षता मूर्तीसोबत गोपूजन करताना दिसत आहेत. अक्षता मूर्ती इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांची मुलगी आहे. व्हिडीओमध्ये ऋषी सुनक पत्नी अक्षतासोबत गायीसमोर आरती करताना दिसत आहे. पूजेदरम्यान त्यांच्या जवळ उभा असलेला पुजारी त्यांना इतर पद्धती सांगताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सुरूवातीला ऋषी सुनक पितळेचं भांडं हातात पडकलेले दिसत आहे, या भांड्यातून ते गायीला पाणी अर्पण करत आहेच. पुजारी त्यांच्या हातात दिवा देतात, दिवा लावून ते त्यांची पूजा पूर्ण करतात. त्यांच्यासोबत पत्नी अक्षता शेजारी उभ्या असलेल्या असून गायीसमोर आरती करताना दिसते. या व्हिडीओमध्ये गायीलाही रंगांनी सजवलेली दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या























