Jyoti Malhotra Case | पाकिस्तानात लग्न करून द्या, ISI एजंट अली हसन कडे ज्योतीनं केलेली मागणी
Jyoti Malhotra Case | पाकिस्तानात लग्न करून द्या, ISI एजंट अली हसन कडे ज्योतीनं केलेली मागणी
पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या गद्दार ज्योती मल्होत्राला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तपास यंत्रणांकडून तिची कसून चौकशी सुरू आहे.. ज्योतीच्या चौकशीत नवनवीन माहिती समोर येतेय.. माझं लग्न पाकिस्तानात करून द्या अशी विनंती ज्योती मल्होत्रानं आयएसआय एजंट अली हसनकडे केली होती.. ज्योती आणि अली हसन यांच्यातलं व्हॉट्सअॅप चॅट समोर आलंय. ज्योती आणि अली हसन हे नेहमीच चॅट करत असतं. ज्योतीच्या ४ बँक अकाऊंटची माहिती पोलिसांना मिळालीय. एका अकाऊंटमध्ये दुबईतून व्यवहार झाल्याचंही दिसतंय.
गद्दार ज्योती मल्होत्राने अखेर आयएसआयशी संबंधांची कबुली दिलीय. पाकिस्तानात अली हसनने इतर आयएसआय अधिकाऱ्यांशी भेट घालून दिल्याची कबुली ज्योती मल्होत्राने दिलीय.
पाकिस्तानातच आयएसआय एजंट शाकीर, राणा शाहबाजचीही भेट झाली. त्यापैकी शाकीरला ती भारतात आल्यावर सर्व गोपनीय माहिती पुरवत होती. त्यासाठी तिने शाकीरचा 923176250069 हा नंबर 'जट रंधावा' नावे सेव्ह केला होता. शाकीरशी वारंवार चॅटमधून देशाविरोधातली माहिती दिल्याची कबुली ज्योतीने दिलीय. दानिशच्या मदतीने ज्योतीने दोनवेळा पाकिस्तान दौराही केल्याचं उघड झालंय.























