Indonesia Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने इंडोनेशिया हादरलं, 20 जणांचा मृत्यू : ABP Majha
इंडोनेशियाची (Indonesia) राजधानी जकार्ता भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं. भूकंपाची तीव्रता 5.6 रिश्टर स्केल इतकी असल्याची माहिती मिळत आहे. इंडोनेशियातील प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचं केंद्र सियांजूर, पश्चिम जावा येथे 10 किमी (6.21 मैल) खोलीवर होतं. तसेच, यामुळे त्सुनामीचा कोणताही धोका नसल्याचंही प्रशासनानं स्पष्ट केलं. भूकंपामुळे आतापर्यंत तब्बल 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, तब्बल 300 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहेइंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे शुक्रवारी संध्याकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांनी भयभीत झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 7 मिनिटांनी भूकंप झाला.























