Pakistan : पाकिस्तानात राजकीय घमासान, इम्रान खान सरकार कोसळण्याची चिन्हं
तिकडे पाकिस्तानात राजकीय घमासान सुरु आहे आणि इम्रान खान सरकार कोसळण्याची चिन्हं दिसतायत. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत विरोधक इम्रान खान सरकारविरोधात आज अविश्वास ठराव मांडणार आहेत. आपलं सरकार पाडण्यासाठी परदेशातून आर्थिक मदत केली जात असल्याचा आरोप इम्रान खान यांनी काल बोलावलेल्या पक्षाच्या विराट सभेत केला. राजीनामा देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. आज ठराव मांडला जाणार असला तरी त्यावर मतदान मात्र ४ एप्रिल रोजी होण्याची शक्यता आहे. सरकार या अविश्वास ठरावावर चालढकल करण्याची भूमिका घेईल असे संकेत गृहमंत्री शेख रशिद अहमद यांनी दिलेत. प्रस्ताव दाखल झाल्यानंतर त्यावर तीन दिवसांत किंवा सात दिवसांनंतर मतदान घेता येत नाही, असं अहमद यांनी म्हटलंय..... त्यामुळे इम्रान खान कोणता डाव खेळणार याची उत्सुकता आहे.....






















