Horoscope Today 15 March 2026 : आज रविवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने विघ्न टळणार, आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 15 March 2026 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 15 March 2026 : वैदिक पंचांगानुसार, आज 15 मार्च 2026, आजचा वार रविवार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. सूर्यदेवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
धार्मिक कार्यक्रमांमध्ये जरा जास्तच लक्ष घालावे ज्या ठिकाणी मान मिळेल त्या ठिकाणी काम करण्यास प्राधान्य द्याल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
उच्चपदस्थ लोकांशी संबंध येऊन त्यांच्यामुळे आर्थिक प्रश्न सुटून जातील.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
धंद्यामध्ये पार्टनरशी जमवून घ्यावे लागेल कमी वेळामध्ये जास्त काम करण्याच्या प्रयत्नात हास्यास्पद चुका कराल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
वारा येईल तशी पाठ फिरवण्याची हातोटी असल्यामुळे कामे होतील भाग्याची साथ मिळेल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
आज प्रयत्नांना जास्त महत्त्व द्या महिला किरकोळ गोष्टीतही मानापमान ठेवतील.
कन्या रास (Virgo Horocsope Today)
दैव देतोआणि कर्म नेतं अशी अवस्था आज होणार आहे त्यामुळे थोडी निराशा पदरात पडेल.
तूळ रास (Libra Horoscope Today)
कुटुंबा बाबत जरा जास्तच भावनिक बनाल अपेक्षाभंगाचे दुःख पदरात पडू शकते.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
नोकरी धंद्यामध्ये कामाच्या बाबतीत अव्यवहारी निर्णय घेतले जातील.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
महत्त्वाच्या कागदपत्रांवर न बघता सह्या करू नका आपले सामर्थ्य ओळखून कामाचा आवाका वाढवा.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
आज कष्ट न करण्याकडे प्रवृत्ती राहील पैसा मिळवण्यासाठी इतर कोणत्याही मार्गाचा अवलंब केल्यास महागात पडेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
विद्यार्थी अभ्यासाच्या बाबतीत वेगळ्या पद्धतीचा अवलंब करतील त्यांच्या वागण्यामध्ये थोडा विक्षिप्तपणा जाणवेल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
आपल्या कृतीमुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक ठरेल इतरांची बोलणी ऐकून घ्यावी लागतील.
हे ही वाचा :
Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी कोणत्या राशींना लागणार लॉटरी? वाचा साप्ताहिक राशीभविष्य



















