Ahmedabad Plane Crash black box : अपघातग्रस्त विमानाचा महत्वपूर्ण ब्लॅकबॉक्स सापडला, कारण येणार समोर
Ahmedabad Plane Crash black box : अपघातग्रस्त विमानाचा महत्वपूर्ण ब्लॅकबॉक्स सापडला, कारण येणार समोर
ब्लॅक बॉक्स म्हणजे काय?
सर्वात पहिले विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधला जातो. ज्याला फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) असेही म्हटले जाते. हे एक प्रकारचे रेकॉर्डिंग डिव्हाइस असते, ज्यामध्ये विमानाच्या उड्डाणादरम्यान कॉकपिटमधील संभाषण आणि उड्डाणाचे डेटा रेकॉर्ड केले जाते. ब्लॅक बॉक्सचा रंग नारंगी असतो. या ब्लॅक बॉक्सवर आग किंवा पाण्याचा कोणताही परिणाम होत नाही. ब्लॅक बॉक्सची बॅटरी 30 दिवस टिकते. त्याच्या डेटाचा वापर अनेक वर्षांनंतरही करता येतो. ब्लॅक बॉक्स कोण शोधतं? विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्स ही त्या अपघाताशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी एक अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाची गोष्ट ठरते. विमान अपघातानंतर त्याच्या तपासासाठी खास प्रशिक्षण दिलेली एअर क्रॅश तपासणी टीम ब्लॅक बॉक्स शोधण्याचे काम करते. विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्युरो (AAIB) यांच्या वतीने या टीम्स पाठवण्यात येतात. यामध्ये अनेक वेळा नौदल किंवा विशेष बचाव पथक देखील सहकार्य करते.























