एक्स्प्लोर
Washim Pohradevi : पोहरादेवीचे महंत सुनील महाराज अखेर शिवसेनेत प्रवेश करणार
पोहरादेवीचे महंत सुनील महाराज अखेर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सुनील महाराज शिवबंधन बांधणार, अशी बातमी एबीपी माझानं दिली होती. त्यावर सुनील महाराज यांनीच शिक्कामोर्तब केलंय. संजय राठोड यांना मंत्रिपद मिळावं म्हणून सुनील महाराज यांनी मुंबईत गाठीभेटी घेतल्या होत्या. पण मंत्रिपद मिळाल्यानंतर संजय राठोड यांनी त्यांना भेट नाकारली आणि सुनील महाराज नाराज झाले. या नाराजीनंतर सुनील महाराज आता शिवसेनेत जाणार आहेत. राठोड आणि सुनील महाराज हे दोघेही बंजारा समाजातून येतात. त्यामुळे पुढच्या काळात राजकारणात हे दोन्ही नेते एकमेकांसमोर उभे ठाकणार का? अशी चर्चा सुरु झालीय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















