Wardha : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात, ग्रंथदिंडीसाठी जय्यत तयारी ABP Majha
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Wardha : विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्यावतीने वर्धा येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीमध्ये 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. स्वावलंबी शिक्षण मंडळाचे पटांगण त साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून साहित्य नगरी सजली आहे. साहित्य संमेलनाचे उद्घाटन आचार्य विनोबा भावे सभामंडपातील प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक न्या. नरेंद्र चपळगावकर, मावळते संमेलनाध्याक्ष ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे, स्वागताध्यक्ष दत्ता मेघे यांच्यासह ज्येष्ठ हिंदी कवी व समीक्षक डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास, आमदार डॉ. विश्वजीत कदम, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. तत्पूर्वी, सकाळी 8 वाजता ग्रंथदिंडी निघणार असून अखिल भारतीय महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.