SSR Case Update |सुशांतच्या मृत्यूच्या आदल्या रात्री कोणतीही पार्टी झाली नाही,इमारतीतील महिलेचा दावा
मुंबई : सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुशांतच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेने मोठा खुलासा केला आहे. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, 13 जूनच्या रात्री सुशांतच्या घराची लाईट बंद होती. फक्त किचनची लाईट सुरु होती. सुशांतच्या फ्लॅटमधील लाईट्स इतरवेळी रात्री उशिरापर्यंत सुरू असायच्या असंही या महिलेनं सांगितलं.
महिलेने दावा केला की, 13 जूनच्या रात्री सुशांतच्या फ्लॅटमध्ये कोणत्याही प्रकारची पार्टी झाली नाही. या संपूर्ण घटनेत काहीतरी गडबड आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीआय याप्रकरणी महिलेची आणखी चौकशी करत आहे. मात्र सीबीआय या महिलेची आजच चौकशी करणार नंतर चौकशी याची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही.




















