Water Cut In Thane : ऐन पावसाळ्यात ठाणेकरांपुढे पाणी संकट, 15 दिवसातून एकदा विभागवार पाणी पुरवठा
ठाणे शहरात तात्पुरत्या स्वरूपात विभागवार पद्धतीने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतलाय. या निर्णयामुळे पंधरा दिवसातून एकदा एकेका विभागाचा पाणी पुरवठा १२ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात ठाणेकरांपुढे पाणी संकट उभं ठाकलंय. ठाणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर झाडांच्या फांद्या आणि गाळ वाहून येत असल्याने पुरेशा पाण्याचा उपसा करणं शक्य होत नाही. यामुळे ठाणे पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळं ठाणेकरांनी आवश्यक तो पाण्याचा साठा करून ठेवाव, तसंच पाणी गाळून आणि उकळूनच वापरावं, असं आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलंय. .























