Fadnavis meet Shinde : उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून निवासस्थानी भेट घेत मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण ठाण्यात शुभेच्छांचे बॅनर्स लागले आहेत. त्यात लुईसवाडी येथील एक बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. या बॅनरवर आनंद दिघे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या पायाशी बसले असून त्यांचे आशीर्वाद घेताना दिसत आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात अनेक उपक्रम राबवले जातायत. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलीय.























