एक्स्प्लोर
Pandharpur Ujani Water : उजनीचं पाणी अखेर पंढरपुरात पोहोचलं, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सोलापूर या शहरांची तहान भागवण्यासाठी मंगळवारी उजनी धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं आहे. पाचव्या दिवशी अखेर उजनीतून सोडलेले पाणी पंढरपूरमध्ये पोचले.. पुढे सोलापूरसाठी अजून ११५ किलोमीटर पाण्याा प्रवास शिल्लक आहे.... उजनीचे पाणी पंढरपूरमध्ये पोचल्याने पंढरपूर, सांगोला शहरांसह सांगोला तालुक्यातील ८१ गावे आणि पंढरपूर तालुक्यातील कासेगाव पाणीपुरवठा योजनेची तहान पुढच्या दोन महिन्यासाठी भागणार आहे..
आणखी पाहा























