Pandharpur : कार्तिकी यात्रेसाठी देवाचा पलंग निघाला, आजपासून विठुरायाचे 24 तास दर्शन
कार्तिकी यात्रेसाठी भाविकांना विठुरायाच्या दर्शन व्हावं यासाठी लाभ देण्यासाठी आजपासून देवाचे राजोपचार बंद करून २४ तास दर्शन व्यवस्था सुरु करण्यात आली आहे . आज सकाळी अकरा वाजता विठ्ठल रुक्मिणीचा पलंग काढण्यात आला आहेत . देवाचा पलंग निघतो म्हणजेच देवाची रात्रीची विश्रांती बंद होत असते . आषाढी आणि कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूर मध्ये येत असतात , यातील जास्तीतजास्त भाविकांना देवाच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्याची परंपरा आहे . त्यानुसार देवाचा आणि रुक्मिणी मातेच्या शेजघरातील पलंग काढून ठेवण्यात येतो यामुळे देवाची झोप बंद होते अशी प्रथा आहे . गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे पलंग निघत होता , मंदिरही २४ तास खुले राहायचे मात्र मंदिरात भाविकांना प्रवेश नसायचा . यंदा दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त कार्तिकी यात्रा होणार असल्याने संपूर्ण यात्रा काळात आजपासून लाखो भाविकांना २४ तास दर्शन मिळणार आहे .























