Mahesh Manjrekar : महेश मांजरेकरांच्या अडचणीत वाढ, बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी चौकशीचे आदेश.
पुणे सोलापूर (Pune-Solapur Road) महामार्गावरील यवत गावाजवळ चित्रपट दिगदर्शक महेश मांजरेकर आणि टेभुर्णीतील आश्रमशाळेचे संस्थाचालक कैलास सातपुते (Kailas Satpute) यांच्यात अपघात झाला होता. यावेळी महेश मांजरेकर यांनी संस्थाचालक कैलास सातपुते यांच्याविषयी बदनामी करणारे वक्तव्य केले होते. या प्रकरणी माढा न्यायालयाच्यावतीने टेभुर्णी पोलिसांना महेश मांजरेकर यांच्याविरुध्द चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे मांजरेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. याप्रकरणी टेंभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. त्याबरोबरच पंढरपूरच्या माढा न्यायालयाने टेभुर्णी पोलिसांना त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.






















