Raj Thackeray PC Sindhudurg : समान नागरी कायद्याला पाठिंबा, शरद पवार यांच्यावर हल्लाबोल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Sindhudurg) हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी कुडाळमध्ये (Kudal) पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यावर भाष्य केलं. समान नागरी कायदा राज्यात नाही तर देशात लागू होतो, एका राज्यात नाही तर देशात येतो. समान नागरी कायदा आला पाहिजे या मताचा मी आहे. जातीपलिकडे जाऊन इतिहास पाहणं महत्वाचे. इतिहासाबद्दल नेहमी कुतूहल आहे. वेडात मराठे वीर दौडले सात हे सात होते की आठ होते की दहा हे काल्पनिक आहे, याचा जगात कुठेही पुरावा नाही. पोवाडे, गोष्टी ज्यातून इतिहाचा पुरण चढेल यासाठी त्या गोष्टी बोलल्या जातात. शिवरायांना धक्का लावणारा मायकालाल पैदा झाला नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या























