Maharashtra Kesari 2023 : सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाडची सांगलीत पुन्हा कुस्ती लढवू :संजय भोकरे
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पैलवान सिकंदर शेख याचा महेंद्र गायकवाड यांच्याकडून पराभव झाला आणि वादाला नव्या़नं सुरुवात झाली. त्या वाद शमवण्याची भूमिका सांगली- मिरज मधील अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय भोकरे यांनी घेतलीय. त्यासाठी त्यांनी पैलवान सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये मातीतील निकाली कुस्त्यांचे खास मैदान अंबाबाई तालीम संस्थेच्या मैदानात लवकरच घेण्याची तयारी दर्शवली आहे. मैदानात येऊन लढण्याची सिकंदर शेखने तयारी देखील दर्शवली असून महेंद्र गायकवाडने देखील या मैदानात येऊन लढावे आणि हा कुस्तीमधील सुरू असलेला वाद थांबवावा असे आवाहन संजय भोकरे वस्ताद यांनी केलंय























