एक्स्प्लोर
Sangli Rain : सांगलीलाही अवकाळी पावसाचा फटका, द्राक्षबागांचं मोठ्याप्रमाणात नुकसान
सांगली जिल्ह्यात काल सायंकाळी सर्वत्र कमी अधिक पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे काही ठिकाणी द्राक्षबागा शिल्लक आहेत तेथे जास्त नुकसान झालेय. शिवाय रॅकवर बेदाणा बनवण्यासाठी टाकलेल्या द्राक्षाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच भागात सायंकाळी वादळी वाऱ्यासह उन्हाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. चार दिवसांपासून या भागात वातावरणात बदल झाला होता. आज सकाळपासून ढगाळ वातावरण व उकाडा वाढला असताना सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने हजेरी लावली.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















