(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli Krushna River Fish : वसंतदादा साखर कारखाना पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे आदेश
Sangli Krushna River Fish : वसंतदादा साखर कारखाना पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे आदेश
बातमी एबीपी माझाच्या इम्पॅक्टची. प्रदूषण मंडळाने कृष्णा नदीतील प्रदूषण प्रकरणी वसंतदादा साखर कारखान्यावर थेट कारवाईचा बडगा उगारलाय. पुढील आदेश येईपर्यंत कारखाना बंद करण्याचा आदेश देण्यात आलाय. एवढंच नाही तर २४ तासांत कारखान्याची वीज आणि पाणी जोडणी तोडण्याचाही आदेश दिलाय. दोन दिवसांआधी कृष्णा नदीत हजारो माशांचा मृत्यू झाला होता. सलग दोन दिवस नदीत मृत माशाचा खच पडला होता. कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा एबीपी माझाने लावून धरल्यानंतर प्रदूषण मंडळाने कारखान्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय. आणि कृष्णेत मळीमिश्रीत पाणी सोडणाऱ्या कारखान्यांपैकी वसंतदादा साखर कारखान्यावर कारवाई करण्याचा आदेश दिलाय. वसंतदादा साखर कारखान्याचे मळीमिश्रित पाणी शेरी नाल्याद्वारे कृष्णेत मिसळत होते.