एक्स्प्लोर
Sangli : बाप्पाच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव,गणपती विसर्जनावर पाणीबाणी : ABP Majha
यंदा पावसाने ओढ दिल्याने पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय.. आणि याचाच परिणाम आता सणांवरही होवू लागलाय. राज्यभर सध्या गणेशोत्सवाची धामधूम पहायला मिळतेय. पण अशात सांगलीकरांसमोर बाप्पाच्या विसर्जनाचा प्रश्न उभा राहिलाय. पाऊसच नसल्याने कृष्णेच्या पाणीपातळीत घट झालीये. मोठ्या गणपतीचं विसर्जन इथे करणं शक्य नाहीये.. त्यामुळे गणपती विसर्जनासाठी कृत्रिम कुंड आणि तलावाची व्यवस्था कऱण्यात आलीये. दुसरीकडे जत तालुक्यातल्या पूर्व भागामध्ये निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर गावातील तलावांमध्ये पाणी सोडावं अन्यथा गणेशमूर्तीचं विसर्जन न करण्याचा इशारा स्थानिकांनी दिलाय..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























