Chitale :चितळे डेअरीच्या वतीने उभारलेली आशिया खंडातील सर्वात मोठी 'सेक्सेल सीमेन जेनेटिक' प्रयोगशाळा
चितळे डेअरी यांच्या वतीने आशिया खंडातील सर्वात मोठी "सेक्सेल सीमेन जेनेटिक" प्रयोगशाळा उभारण्यात आली. सांगलीतील या प्रयोगशाळेचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवारांच्या हस्ते करण्यात आलं. जागतिक पातळीवर दूध व्यवसायाचा विचार केला तर दुभत्या जनावरांची संख्या सर्वाधिक आपल्या देशात आहे. मात्र, जगाच्या तुलनेत दूध उत्पादनाचा वाटा केवळ १० टक्के आहे. जनावरापासून मिळणार्या दूधाचे प्रमाण कमी असल्याने दूधाच्या परिमाणात वाढ होण्यासाठी ब्रम्हा प्रकल्पात संशोधन करण्यात आलं.. सिमेन्समधील स्त्री बीज विलग करुन त्याचे मुर्हाध म्हशीच्या गर्भामध्ये रोपण करण्यात आलं. हे रोपण यशस्वी झाले असून हा जगातील पहिलाच प्रयोग असल्याची माहिती जीनस एबीएसचे संचालक विश्वास चितळे यांनी दिलीये...






















