Ratnagiri : संत ज्ञानेश्वर सेवा गोशाळा वादाच्या भोवऱ्यात, प्रशासनाकडून चौकशी सुरु : ABP Majha
रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोटे गावात असलेली संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधार सेवा गोशाळा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात या अधिवेशनावर लक्षवेधी आणली होती. आणि त्यानंतर या गोशाळेची चौकशी सुरू आहे.. मात्र ही अडचण एवढ्यावर थांबली नसून आता स्थानिकांनी एकत्र येत ही गोशाळा बंद करण्याबाबत ठराव आणलाय. गावच्या पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत असलेल्या ओढ्यात गोशाळेतील मल-मूत्र विसर्जित केलं जातं असा आरोप स्थानिकांनी केलाय. मात्र या गोशाळेचे संचालक असलेल्या कोकरे महाराज यांनी मात्र गावकऱ्यांनी आपल्याला गणेशोत्सवादरम्यान मारहाण केल्याची तक्रार केलेय आणि पोलीस दखल घेत नसल्याचा आरोपही केलाय. भास्कर जाधवांच्या कार्यकर्त्यांकडून गोशाळा पाडण्याचं नियोजन होतंय असा गोळाळा संचालकांचा आरोप आहे.























