(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ratnagiri Lanja Amol Bole : Refinery विरोधकांचे नेते अमोल बोळेंना हद्दपार करण्याचा अहवाल ABP Majha
Ratnagiri Lanja Amol Bole : Refinery विरोधकांचे नेते अमोल बोळेंना हद्दपार करण्याचा अहवाल ABP Majha
कोकणातील रिफायनरीबाबतच्या घडामोडी सातत्याने सुरूच आहेत. यापूर्वी रिफायनरी विरोधकांना उपविभागीय अधिकारी लांजा हद्दपारी का करू नये? याबाबत विचारणा केली होती. त्यानंतर आता रिफायनरी विरोधकांचे गावचे अध्यक्ष अमोल बोळे यांना दोन वर्ष हद्दपारची शिफारस उपविभागीय अधिकारी लांजा यांनी केली आहे. त्यांचा हा अहवाल एबीपी माझाच्या हाती लागला आहे. या अहवालामध्ये त्यांनी अमोल बोळे यांचे एकंदरीत वर्तन पाहता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56( 1 ) अ मधील तरतूद पाहता रत्नागिरी जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्याची शिफारस केली आहे. अमोल बोळे यांच्यासह पाच जणांना 28 ऑक्टोबर 2022 रोजी हद्दपारीबाबत म्हणणं मांडण्याची नोटीस बजावली होती. त्यानंतरचा हा अहवाल आहे. 8 जून 2022 शिवणे सडा, 29 जून गोवळ सडा, 19 आणि 20 ऑगस्ट 2022 रोजी निलेश राणे यांना घेराव, 11 सप्टेंबर नाना पटोले सभा आणि 12 सप्टेंबर 2022 रोजी राजापूर पोलीस स्टेशनसमोर आंदोलन हे रिफायनरी वीरोधकांनी केले होते.