एक्स्प्लोर
Ratnagiri Barsu Solgaon Refinery : बारसू आंदोलन स्थळावरुन माध्यमांना हटवण्याचा प्रयत्न
बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधात कालपासून आंदोलन सुरू आहे.. आज सकाळी साडे आठच्या सुमाराला पोलिसांचा फौजफाटा तिथं दाखल झाला. आंदोलनातील महिलांनी मात्र पोलिसांच्या गाड्या अडवल्या. जीव गेला तरी बेहत्तर, पण आम्ही इथून हटणार नाही, अशा भावना आंदोलक महिलांनी व्यक्त केल्या. दरम्यान, पोलिसांनी माध्यम प्रतिनिधींना दमदाटी केली. पुन्हा इथं दिसायचं नाही, अशा भाषेत पोलीस वार्ताहारांशी बोलत होते.. काही पत्रकारांना तर हाताला धरून बाहेर काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.
आणखी पाहा























