Uddhav Thackeray on Barsu : बारसू प्रकल्पामुळे काताळशिल्पे धोक्यात : उद्धव ठाकरे
महाडमध्ये पोहोचण्याआधी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पोहोचले, ते बारसूच्या कातळशिल्पांवर...
बारसूमध्ये होणाऱ्या ग्रीन रिफायनरीमध्ये, युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट होणारी कातळशिल्पेही नामशेष होणार आहेत... त्यामुळे हा प्राचीन ठेवा जपण्याची गरज उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली...
इतकंच नाही... तर ही कातळशिल्पे धोक्यात असल्याची माहिती... आत्ताच आपल्याला मिळाल्याने, ही शिल्पे वाचवण्यासाठी आपण युनेस्कोला पत्रही लिहिल्याची आठवण त्यांनी करुन दिली...
त्याआधी उद्धव ठाकरे यांनी बारसूमधल्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची भेट घेतली... आणि या आंदोलनाला शिवसेनेची पूर्ण ताकद मिळेल, असं आश्वासन दिलं... कोकणातल्या भूमीपुत्रांवर अन्याय होत असेल, तर प्रकल्पाला आपला विरोधच असेल, या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला























