Cm Eknath Shinde Ratnagiri Daura :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर,रत्नागिरीत जय्यत तयारी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज कोकण दौरा आहे. महाराष्ट्रातील ऐतिहासिक बंडानंतर एकनाथ शिंदे यांचा पहिलाच कोकण दौरा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करणारेत. आणि संध्याकाळी रत्नागिरीच्या प्रमोद महाजन संकुलात एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आलीय. या सभेत ठाकरे गटाचे लांजा येथील काही नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात कोकणातील रिफायनरींचे समर्थक आणि विरोधकांना एकनाथ शिंदे भेटणार का? याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांची नावं निमंत्रक परिकेत आहेत. मात्र कार्यक्रमाला जाणार नसल्याचा खुलासा राजन साळवी यांनी केलाय.























