एक्स्प्लोर

Ichalkaranji Municipal Corporation: इचलकरंजीत भाजपकडून शिंदेसेनेचा टप्प्यात आणून कार्यक्रम? शिंदे गटाला सुटलेल्या जागांवरही भाजपने दिले एबी फॉर्म!

Ichalkaranji Municipal Corporation: इचलकरंजी मनपा निवडणुकीत सर्वाधिक जागा घेऊनही भाजपने शिवसेना शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम केला आहे का? अशी सुद्धा चर्चा निवडणुकीच्या रिंगणामध्ये रंगली आहे.

Ichalkaranji Municipal Corporation: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी जागावाटपाचा तिढा सोडवण्यामध्ये महायुतीला यश आलं असलं, तरी इचलकरंजीमध्ये मात्र महायुती होऊन सुद्धा एकमेकांच्या जागांवर एबी फॉर्म देण्याने महायुतीत रणकंदन होण्याची चिन्हे आहेत. इचलकरंजी मनपा निवडणुकीत सर्वाधिक जागा घेऊनही भाजपने शिवसेना शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम केला आहे का? अशी सुद्धा चर्चा इचलकरंजी मनपा निवडणुकीच्या रिंगणामध्ये रंगली आहे. इचलकरंजी मनपा निवडणुकीमध्ये भाजपने शिवसेना शिंदे गटाला सुटलेल्या जागांवरही उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने अडचण झाली आहे. 

महायुतीच्या जागावाटपात शिवसेना शिंदे गटाला 11 जागा मिळाल्या आहेत. मात्र, पाच जागांवर शिवसेना शिंदे गटासह भाजपचे देखील उमेदवार आहेत. त्यामुळे भाजप उमेदवारांनी या ठिकाणी माघार नाही घेतली तर महायुतीमध्ये मिठाचा खडा पडू शकतो. इचलकरंजीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची 10 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होत आहे. त्यामुळे एकंदरीतच महायुतीमध्ये 65 जागांसाठी जवळपास 78 फॉर्म देण्यात आले आहेत. त्यामुळे उमेदवारांसह मतदार सुद्धा गोंधळण्याची शक्यता आहे. इचलकरंजीमधील शेवटच्या क्षणापर्यंत एबी फार्म वाटण्याचा जो घोळ घालण्यात आला ते पाहता महायुतीमध्ये रणकंदन माजण्याची चिन्हे आहेत. भाजपकडून एकूण 56 जणांना उमेदवारी अर्ज देण्यात आली आहे.  

तब्बल 13 जागांवर अधिकचे उमेदवार 

एकूण 65 जागांसाठी तब्बल 78 एबी फॉर्मचे वाटप केल्याने तब्बल 13 जागांवर अधिकचे उमेदवार आहेत. भाजपने 56 उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. शिंदेसेनेकडून 10 उमेदवारांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पवार गटाने तब्बल 12 उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. राष्ट्रवादीकडून दोन जागांवर महायुतीचा भाग म्हणून तर दहा जागांवर ‘मैत्रीपूर्ण लढत’ करण्याची घोषणा करण्यात आली आहे.  

ठरलेला फॉर्म्युला आणि प्रत्यक्षात विसंगती

महायुतीतील जागावाटपाचा मूळ फॉर्म्युला आधीच ठरलेला होता. त्यानुसार भाजप 54 आणि शिंदेसेना 11 जागांवर लढणार होती, तर भाजपच्या कोट्यातून दोन जागा राष्ट्रवादीला देण्याचे ठरले होते. मात्र प्रत्यक्षात भाजपने 56, शिंदेसेना 10 आणि राष्ट्रवादीने 12 जागांवर उमेदवार दिल्याने हा फॉर्म्युला पूर्णपणे बिघडल्याचे स्पष्ट झाले आहे.

एकाच प्रभागात अनेक उमेदवार 

ज्या-ज्या प्रभागांत महायुतीकडून दोन-तीन पक्षांचे उमेदवार उभे आहेत, त्या ठिकाणी उमेदवार ‘गॅस’वर असल्याचे वातावरण आहे. आता माघारीपर्यंत पडद्यामागील वाटाघाटी सुरू राहणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. काही ठिकाणी ‘मैत्रीपूर्ण लढत’ या नावाखाली उमेदवार रिंगणात ठेवून जो निवडून येईल, त्याला महायुतीचा अधिकृत उमेदवार मानले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुतीतील हा अंतर्गत कलह आणि अनेक प्रभागांत सहयोगी पक्षांचे स्वतंत्र उमेदवार असल्यामुळे मतदारांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. आपल्या प्रभागात नेमका महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण, हा प्रश्न मतदारांना पडल्याचे चित्र सध्या इचलकरंजीत दिसून येत आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंदूक चेक करताना आपल्याच सोसायटीत गोळीबार, हवेमुळे गोळीची दिशा बदलली अन्.., वादग्रस्त अभिनेत्याच्या अटकप्रकरणी नवा ट्विस्ट
बंदूक चेक करताना आपल्याच सोसायटीत गोळीबार, हवेमुळे गोळीची दिशा बदलली अन्.., वादग्रस्त अभिनेत्याच्या अटकप्रकरणी नवा ट्विस्ट
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीनं बायकोला गोळ्या घातल्या, असं काय घडले की त्यानं नातेवाईकांना सुद्धा सोडलं नाही?
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीनं बायकोला गोळ्या घातल्या, असं काय घडले की त्यानं नातेवाईकांना सुद्धा सोडलं नाही?
बीडमध्ये 2 खळबळजनक घटना, पतीकडून पत्नीची हत्या, मृत्यूचा बनाव रचला; बिंदुसरा धरणात आढळला युवकाचा मृतदेह
बीडमध्ये 2 खळबळजनक घटना, पतीकडून पत्नीची हत्या, मृत्यूचा बनाव रचला; बिंदुसरा धरणात आढळला युवकाचा मृतदेह
Dombivli News: डोंबिवलीत हप्ता घेऊनही पालिकेने मराठी तरुणीचा स्टॉल उचलला, राज ठाकरेंनी अविनाश जाधवांना पाठवलं, म्हणाले, 'तिचा प्रॉब्लेम....'
डोंबिवलीच्या मराठी तरुणीचा स्टॉल पालिकेने उचलला, अविनाश जाधवांना म्हणाली, 'मला राजसाहेबांचा फोटो असलेली एक टपरी द्या मग मला...'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजनेशी संबंधित तक्रारीचे निवारण करण्यासाठी हेल्पलाईन
Sanjay Raut PC :  राजकारणात गुलामांचा बाजार, अजितदादांना महायुतीतून बाहेर पडावं लागणार- संजय राऊत
Kamal Khan News : ओशिवरा गोळीबारप्रकरणी अभिनेता कमाल खान अटकेत, नेमकं प्रकरण काय?
Nashik Currency : खळबळजनक! 2 हजारांच्या नोटांनी भरलेला 400 कोटींचा कंटेनर लूटला!
Mumbai High Court On Pollution : प्रदूषणाने नागरिक बेजार, रोखा पालिका आयुक्तांचा पगार Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंदूक चेक करताना आपल्याच सोसायटीत गोळीबार, हवेमुळे गोळीची दिशा बदलली अन्.., वादग्रस्त अभिनेत्याच्या अटकप्रकरणी नवा ट्विस्ट
बंदूक चेक करताना आपल्याच सोसायटीत गोळीबार, हवेमुळे गोळीची दिशा बदलली अन्.., वादग्रस्त अभिनेत्याच्या अटकप्रकरणी नवा ट्विस्ट
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीनं बायकोला गोळ्या घातल्या, असं काय घडले की त्यानं नातेवाईकांना सुद्धा सोडलं नाही?
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीनं बायकोला गोळ्या घातल्या, असं काय घडले की त्यानं नातेवाईकांना सुद्धा सोडलं नाही?
बीडमध्ये 2 खळबळजनक घटना, पतीकडून पत्नीची हत्या, मृत्यूचा बनाव रचला; बिंदुसरा धरणात आढळला युवकाचा मृतदेह
बीडमध्ये 2 खळबळजनक घटना, पतीकडून पत्नीची हत्या, मृत्यूचा बनाव रचला; बिंदुसरा धरणात आढळला युवकाचा मृतदेह
Dombivli News: डोंबिवलीत हप्ता घेऊनही पालिकेने मराठी तरुणीचा स्टॉल उचलला, राज ठाकरेंनी अविनाश जाधवांना पाठवलं, म्हणाले, 'तिचा प्रॉब्लेम....'
डोंबिवलीच्या मराठी तरुणीचा स्टॉल पालिकेने उचलला, अविनाश जाधवांना म्हणाली, 'मला राजसाहेबांचा फोटो असलेली एक टपरी द्या मग मला...'
मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकांतही भाजपचा 'बिनविरोध पॅटर्न'; सिंधुदुर्गात दोन जागा जिंकल्या
मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकांतही भाजपचा 'बिनविरोध पॅटर्न'; सिंधुदुर्गात दोन जागा जिंकल्या
मुंबईचा महापौर भाजपचाच होईल, नाहीतर...; सुधीर मुनगंटीवारांचा शिंदेंच्या शिवसेनेला थेट इशारा
मुंबईचा महापौर भाजपचाच होईल, नाहीतर...; सुधीर मुनगंटीवारांचा शिंदेंच्या शिवसेनेला थेट इशारा
भाजपचे निष्ठावंत पायदळी तुडवले जात असताना आयाराम-गयाराम शब्दावर पालकमंत्री जयकुमार गोरेंची चिडचिड! वेळ साधनसुचिता पाळण्याचा दिला सल्ला
भाजपचे निष्ठावंत पायदळी तुडवले जात असताना आयाराम-गयाराम शब्दावर पालकमंत्री जयकुमार गोरेंची चिडचिड! वेळ साधनसुचिता पाळण्याचा दिला सल्ला
Navi Mumbai Mahape Fire News : नवी मुंबईत अग्नितांडव! आकाशात आगीच्या भल्यामोठ्या ज्वाळा, महापे एमआयडीसीतील कंपनीत लागली आग
नवी मुंबईत अग्नितांडव! आकाशात आगीच्या भल्यामोठ्या ज्वाळा, महापे एमआयडीसीतील कंपनीत लागली आग
Embed widget