एक्स्प्लोर
Udayanraje at Raigad :गप्प बसणारेहीे राज्यपालांइतकेच दोषी,उदयनराजेंचा अप्रत्यक्षरित्या भाजपवर निशाणा
शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांना जे प्रश्न विचारत नाही, गप्प बसतात, ते राज्यपालांएवढेच दोषी आहेत... अशा शब्दात उदयनराजेंनी हल्लाबोल केलाय.. हा टोला आणि प्रश्न भाजपसाठी तर नव्हता ना अशी आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे... रायगडावर आज निर्धार शिवसन्मानाचा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं.. शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांना टकमक टोकावरुन फेकून दिलं पाहिजे असा शब्दात उदयनराजेंनी संताप व्यक्त केला. तसंच यापुढचं आंदोलन मुंबईतील आझाद मैदानात करण्यात येईल असं उदयनराजेंनी जाहीर केलं. मात्र त्या आंदोलनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही
आणखी पाहा























