एक्स्प्लोर

Raigad ZP Election : रायगडमध्ये भाजप, राष्ट्रवादी विरूद्ध शिवसेनेची जिल्हा परिषदेवर वर्चस्वाची लढाई

Raigad ZP Election : रायगडमध्ये भाजप, राष्ट्रवादी विरूद्ध शिवसेनेची जिल्हा परिषदेवर वर्चस्वाची लढाई

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी पार पडलेल्या मतदानाचा निकाल (Maharashtra Elections 2026) आज जाहीर होणार आहे.  जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समित्यांच्या 1,462  जागांसाठी ही निवडणूक झाली होती. यामध्ये कोकणातील रायगड जिल्हा परिषदेत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. रायगड जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता असलेल्या शेतकरी कामगार पक्षाची (Shetkari Kamgar party) प्रतिष्ठा यंदा पणाला लागली. शेतकरी कामगार पक्ष यंदा महाविकास आघाडीतून निवडणूक लढत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढाई आहे.  शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांचा बालेकिल्ला असणाऱ्या रायगडमध्ये जिल्हा परिषदेची सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपने यावेळी पूर्ण ताकद पणाला लावली होती. रायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष 100 टक्के भाजपचाच बसणार, असा विश्वास भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला होता.  रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी 69.91 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे आजच्या निकालात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. रायगड जिल्ह्यात यावेळी तटकरे विरुद्ध गोगावले यांच्यातील संघर्ष पाहायला मिळाला होता. रायगड जिल्हा परिषदेच्या 59 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 118 जागांचा निकाल आज जाहीर होणार आहे.
Mahayuti ZP Election Resulst 2026: कोकणात महायुतीचे 27 उमेदवार बिनविरोध

कोकणात महायुतीच्या तब्बल 27 जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 8, तर पंचायत समितीच्या 17 जागा महायुतीने बिनविरोध जिंकल्या आहेत.50 सदस्यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे 7 आणि शिंदे गटाचा 1 सदस्य बिनविरोध विजयी झाला आहे. तर 100 सदस्यसंख्या असलेल्या पंचायत समितीमध्ये भाजपचे 16 आणि शिंदे शिवसेनेचा 1 सदस्य बिनविरोध विजयी झाल्याचं समोर आलं आहे. 

रायगड आणि रत्नागिरीतून शिवसेनेचे दोन उमेदवार बिनविरोध जिंकले आहेत. महाड पंचायत समिती निवडणुकीत सवाने धामणे पंचायत समिती गणातून उभे असलेले अनिल जाधव यांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी माघारी घेतल्याने अनिल जाधव हे बिनविरोध निवडून आले आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज पंचायत समिती गणातून शिंदे शिवसेनेच्या उमेदवार डॉ. पद्मजा कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. 

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 16 March 2026: आजचा सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! भोलेनाथांची मोठी कृपा, समस्यांचा अंत, विघ्न टळणार, आजचे राशीभविष्य
आजचा सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! भोलेनाथांची मोठी कृपा, समस्यांचा अंत, विघ्न टळणार, आजचे राशीभविष्य
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय; परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा पराभव
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय
छत्रपती संभाजीनगरमध्ये आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाला संपवलं, चित्रपटाप्रमाणं बनाव रचला, अखेर पोलिसांनी सत्य समोर आणले, तिघांना अटक
छत्रपती संभाजीनगरमध्ये आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाला संपवलं, बनाव रचला पण सत्य समोर, तिघांना अटक
Prajakt Tanpure :  प्राजक्त तनपुरेंची राहुरीच्या पोटनिवडणुकीवर पहिली प्रतिक्रिया, कार्यकर्त्यांचा उल्लेख अन् मुख्यमंत्र्यांचं कौतुक,राजकीय वर्तुळात चर्चा सुरु
प्राजक्त तनपुरेंकडून पोटनिवडणूक जाहीर होताच कार्यकर्त्यांचा उल्लेख आणि मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राजकीय वर्तुळात चर्चा सुरु
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
PAK vs BAN: रोमांचक लढतीत बांगलादेशचा पाकिस्तान विजय, सलमान आगाचं शतक वाया, पाकनं मालिका गमावली 
पाकिस्तानवर मोठी नामुष्की, बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात विजय, मालिका 2-1 नं जिंकली
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय; परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा पराभव
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
Embed widget