एक्स्प्लोर
Alibag Traffic : थर्टी फर्स्ट त्यात सलग सुट्ट्या, अलिबाग-पेण मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
अलिबाग-पेण मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. मुंबईकडे परतणाऱ्या मार्गावर ही वाहतुक कोंडी निर्माण झालीये. वडखळ ते शहाबाज मार्गावर सुमारे तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात. थर्टी फर्स्ट त्यात सलग सुट्ट्या लागून आल्याने अनेकांनी अलिबाग गाठलं होतं..आता मात्र पर्यटक परतीच्या प्रवासाला निघालेत त्यामुळे ट्राफिक जामची समस्या निर्माण झालीये. शिवाय इथे अनेक ठिकाणी रस्त्याची कामं सुरु आहेत
आणखी पाहा























