एक्स्प्लोर
Raigad Shivrajyabhishek : रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह, शिवरायांच्या पुतळ्याचं तुलादान
किल्ले रायगडावर उद्या तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा होणाराय. शिवराज्याभिषेक सोहळ्याचं हे 350 वं वर्ष असल्याने या सोहळ्याची भव्यता मोठी आहे. या निमित्ताने होळीचा माळ येथे शिवराज्याभिषेक सोहळ्या आधी शिव तुलादान करण्यात आलंय. शिवरायांच्या 28 किलो वजनाच्या पुतळ्याचं तुला दान करण्यात आलंय. सुखा मेवा, खडीसाखर, वह्या तसेच विविध जिन्नस हे साठ ते पासष्ट संस्था दान करत आहेत. दरवर्षीपेक्षा भव्यदिव्य शिवतुला दानाचा हा कार्यक्रम आहे.
आणखी पाहा























