(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vinayak Kale Sassoon Hospital : ससूनमधले केवळ दोन ते तीन स्टाफ या सगळ्यांध्ये गुंतलेत
ससूनमधले केवळ दोन ते तीन स्टाफ या सगळ्यामधे गुंतले आहेत. इतर सगळे डॉक्टर्स योग्य पद्धतीनं काम करतायत.अशी प्रतिक्रिया ससून रुग्णालयाचे डीन डॉ.विनायक काळे यांनी दिलीय. ससून रुग्णालयातील घडलेली बाब दुर्दैवी आहे असं व्हायला नको होतं. असंही काळे म्हणालेत.
अहवाल वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांकडे
ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी तयार करण्यात आलेल्या एसआयटीच्या प्रमुख डॉ. पल्लवी सापळे यांनी आपला अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवातकर यांना सादर केला. आता तो अहवाल वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना देखील प्राप्त झाला. अहवाल प्राप्त झाल्याने तातडीने क्लास वन अधिकारी डॉ.अजय तावरे यांच्या कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांना कळवण्याची प्रक्रिया सुरू आहे तर डॉ. श्रीहरी हरनोळ हे क्लास टू चे रँकचे अधिकरी आहेत. हरनोळ आणि शिपाई घटकांबळे यांची तातडीने शासन स्तरावर आता कारवाई झाली असून डॉ. तावरेंकडीली पदभार काढून घेण्यात आला आहे.