एक्स्प्लोर
Ravindra Dhangekar Wins Kasba Bypolls : रवींद्र धंगेकरांना कसब्याची आमदारकी, मविआकडून मिरवणूक
Kasba Peth By-Election Results 2023: पहिल्या दिवसापासूनच वादात सापडलेल्या आणि चर्चेत असलेल्या कसबा पोटनिवडणुकीचा (Kasba Bypoll Election Result) निकाल अखेर हाती आला आहे. कसब्यात काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपच्या पारंपारिक मतदारसंघात काँग्रेसच्या (Congress) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी विजयी मुसंडी मारत भाजपच्या हेमंत रासने (Hemant Rasne) यांचा पराभव केला आहे.
कसब्यात मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकरांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. महत्त्वाची बाब म्हणजे, सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ या पेठांमधील मतमोजणी पूर्ण झाल्यावर देखील कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर आघाडीवर होते. हे अनपेक्षित आणि कसब्याच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच घडलं असेल. सदाशिव पेठ, नारायण पेठ, आणि शनिवार पेठेत भाजपच्या हेमंत रासनेंना आघाडी मिळाली खरी, मात्र ती रवींद्र धंगेकरांना पिछाडीवर टाकण्यास फारशी उपयोगी पडली नाही. रासनेंना मिळालेली आघाडी धंगेकरांना मिळालेल्या कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ इथल्या आघाडीवर मात करु शकली नाही. अखेर भाजपचा पारंपारिक मतदारसंघ काँग्रेसने हिसकावून घेतल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा हा मोठा विजय असल्याचं बोललं जात आहे.
पुणे
Makarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...
Fatima Shaikh:फातिमा शेख एक कल्पोकल्पित पात्र,दिलीप मंडल यांच्या वक्तव्यावर मिलिंद आव्हाड म्हणाले...
Ajit Pawar PC : Dhananjay Munde ते Walmik Karad , अजितदादांची पहिली पत्रकार परिषद ABP Majha
Pune : 5 जानेवारीला Sharad Mohol हत्येला वर्ष,हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग;पोलिसांची अटक
Manoj Jarange Pune : जर धनंजय मुंडेचं पोट भरलं नसेल तर..आता आमचा नाईलाज आहे..-जरांगे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement