Raj Thackeray Pune : राज ठाकरेंकडून पुण्यातील पूरपरिस्थितीची पाहणी
Raj Thackeray Pune : राज ठाकरेंकडून पुण्यातील पूरपरिस्थितीची पाहणी दरवर्षी कितीतरी मुलं कलेक्टर, एसपी होण्याचं स्वप्न बाळगतात आणि दिल्ली गाठतात. आपला मुलगा किंवा मुलगी अधिकारी म्हणून गावात येईल आणि आपण तिचं यश मिरवू असं अनेक पालकांची इच्छा असते. असंच कलेक्टर होण्याचं स्वप्न बाळगून दिल्ली गाठलेली श्रेया यादव ही 25 वर्षाची मुलगी आता परत तिच्या गावी जाऊ शकणार नाही, किंवा तिच्या आई-वडिलांनाही कधीच भेटू शकणार नाही. दिल्लीतील राजेंद्र नगरमध्ये (Old Rajendra Nagar) पूरस्थिती निर्माण झाल्यानं एका कोचिंग सेंटरच्या (Rau's IAS study circle tragedy) तळघरात पाणी शिरलं. त्यामध्ये श्रेया यादवचा दुर्दैवी मृत्यू झाला. दिल्लीत शनिवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस पडला आणि त्यानंतर आलेल्या पूरस्थितीमुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांचे केंद्र असलेलं राजेंद्र नगर मात्र हादरलं. या ठिकाणच्या राव स्टडी सेंटरमध्ये झालेल्या एका अपघातात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यामध्ये उत्तर प्रदेशमधील आंबेडकर नगरच्या श्रेया यादवचा समावेश आहे. श्रेयाच्या आई-वडिलांचं स्वप्न अधुरं आपल्या मुलीने आयएएस अधिकारी व्हावं हे श्रेयाच्या आई-वडिलांचं स्वप्न, म्हणून त्यांनी तिला दिल्लीला पाठवलं. पण दिल्लीत अचानक पुराची स्थिती निर्माण झाली आणि त्यामध्ये श्रेयाचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूसोबत तिच्या आई-वडिलांची इच्छाही वाहून गेली. श्रेयाच्या कुटुंबियांसाठीही हा अत्यंत दुःखद क्षण आहे. या वर्षी एप्रिलमध्येच श्रेया आयएएसच्या तयारीसाठी दिल्लीत आली होती. मात्र शनिवारी संध्याकाळी उशिरा दिल्लीतील राजेंद्र नगर येथील राव स्टडी सेंटरमध्ये पाणी साचल्याने तिचा अपघाती मृत्यू झाला. दोन भाऊ आणि बहिणींमध्ये ती सर्वात मोठी होती. श्रेयाने सुरुवातीचे शिक्षण उत्तर प्रदेशातील अकबरपूरमधूनच केले. यानंतर त्यांनी सुलतानपूर येथून ग्रॅज्युएशन केले. तिथून तिने एमएससीही केले आणि त्यानंतर ती आयएएसच्या तयारीसाठी दिल्लीला आली. श्रेयाचे वडील राजेंद्र यादव यांचे बासखरी मार्केटमध्ये दूध डेअरीचे दुकान आहे तर आई गृहिणी आहे. तिचे दोन भाऊ तिच्यापेक्षा लहान असून शिक्षण घेत आहेत. श्रेयाचे काका धर्मेंद्र यादव हे सपाचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत.
![Pune Athawale Group Protest : पुण्यात राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आता भीम अनुयायी आक्रमक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/4a445057d0dde54a120ac85ab5ec8e461739266511456718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Rushikesh Sawant : Tanaji Sawant यांचा मुलगा ऋषिकेष सावंत पुण्यात परतला, नेमकं प्रकरण काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/93824e1273ba1cac78f690debb6fea051739242747201718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Vastav 127 Pune :आंबेडकर भवनच्या विस्तारासाठी प्रस्तावीत जागा बिल्डरच्या घशात कोण घालतंय? ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/07/76b030ff504898baebbbb996ea1931c21738928723247718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Pune Supriya Sule PC : दम देतात तर राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर दादांनी द्यावं : सुप्रिया सुळे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/116cd530074c15bf7868c19823f2f3481738214113190718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Supriya Sule Pune : पुण्यातच नाही तर इतर ठिकाणीही पाणी प्रदूषणाचा प्रश्न : सुप्रिया सुळे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/f38c1a0020e0a3e99f28277d5730d2791738210178849718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)