Rahul Bajaj Last Rites: पुण्यात राहुल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ABP Majha
ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांचं काल पुण्यात निधन झालं. त्यांच्यावर आज पुण्यातल्या वैंकुठ स्मशानभूमी इथं विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या निधनाने महाराष्ट्रासह देशातल्या अनेक प्रतिष्ठित व्यक्ती, नेतेमंडळी तसंच सर्वसामान्यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. राहुल बजाज यांचं पार्थिव त्यांच्या पिंपरी-चिंचवड येथील निवासस्थानी आणण्यात आलं होतं. तिथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि बजाज यांचे मित्र शरद पवार हे देखील उपस्थित होते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पुणे दौऱ्यावर आले असता त्यांनीही बजाज यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. राहुल बजाज यांच्या पार्थिवाचे कामगारांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.























