(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime Special Report : सोकोवले गुन्हेगार; पुण्यात पुन्हा अत्याचार
Pune Crime Special Report : सोकोवले गुन्हेगार; पुण्यात पुन्हा अत्याचार गेल्या काही दिवसांमध्ये अत्याचाराच्या घटनांनी राज्याभरातून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात गेल्या दोन दिवसांमध्ये तीन अत्याचाराच्या संतापजनक घटना समोर आल्या आहेत. यामधील दोन घटनांमध्ये तीन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे, तर एका घटनेत तरूणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची माहिती आहे. या तीन घटनांवरून महिला कुठेच सुरक्षित नसल्याचं चित्र दिसून येत आहे. एका घटनेमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर शाळेला जाणाऱ्या स्कुलबसमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली, तर दुसऱ्या एका घटनेत आपल्या जन्मदात्या नराधम बापाने आपल्या मुलीवर घरातच अश्लील व्हिडिओ दाखवत गेल्या एका वर्षापासून लैंगिक अत्याचार केला, तर तिसरी घटना म्हणजे आपल्या मित्रासोबत पुण्याच्या जवळच असलेल्या बोपदेव घाटात फिरण्यासाठी गेली असतानाच 21 वर्षीय तरूणीचे अपहरण करून तिच्यावर येवलेवाडी परिसरात तिघांनी सामूहिक अत्याचार केला, या घटनांनी शहर हादरले आहे.