Pune Car Accident Case : डॉ. अजय तावरे, श्रीहरी हळनोर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव ABP Majha
पुणे अपघात प्रकरणी आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्याप्रकरणी डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर या दोघांचे निलंबन करण्यासाठीचा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाला पोलिसांमार्फत पाठविण्यात आला आहे. निलंबन होण्यासाठी आवश्यक असलेली पोलीस कारवाई त्यांच्यावर झालेली आहे. त्यामुळे पोलिसांनी संबंधित विभागाला याबाबत बुधवारी अहवाल पाठवला आहे. या अहवालावर संबंधित विभागाकडून काय निर्णय घेतला जातो याकडे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा
Pune Car Accident: अग्रवाल पितापुत्राचा मस्तवालपणा कायम; CCTV, मोबाईलबाबत पोलीस चौकशीत उडवाउडवीची उत्तरे
पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील पोर्शे कार अपघात प्रकरण सध्या प्रचंड चर्चेत आहे. या अपघात प्रकरणाच्या (Pune Car Accident) चौकशीत अनेक गोष्टींबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे अग्रवाल कुटुंबातील बाप-बेटा आणि नातू कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. मात्र, यानंतरही अग्रवाल पिता-पुत्राचा मस्तवालपणा कमी झालेला दिसत नाही. कारण, चौकशीदरम्यान अग्रवाल पिता-पुत्र पोलीस अधिकाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची माहिती समोर आली आहे. विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) याने त्यांचा मोटारचालक गंगाधर यांचे अपहरण करण्यासाठी वापरलेली मर्सिडीज गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. विशाल अग्रवाल याने ड्रायव्हर गंगाधरला वडगाव-शेरी येथील बंगल्यात दोन दिवस डांबून ठेवले होते. यावेळी विशाल अग्रवालने त्याचा मोबाइलही काढून घेतला होता. पोलिसांनी याबाबत विचारल्यानंतर विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र कुमार अग्रवाल (Surendra Kumar Agrawal) उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी न्यायालयात दिली.