एक्स्प्लोर

Pune : पुण्यातील उद्योजक Gautam Pashankar यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल ABP Majha

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यासह तिघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. एवढंच नाहीतर गौतम पाषाणकर यांच्यावर मारहाणीचाही आरोप करण्यात आला आहे. फ्लॅटसाठी दोन कोटी 40 लाख रुपये घेऊनसुद्धा फ्लॅट नावावर केला नाही, याप्रकरणी जाब विचारल्यानंतर कार्यालयात बोलावून मारहाण केली अशी फिर्याद तक्रारदारानं शिवाजीनगर पोलीस स्थानकात केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गौतम पाषाणकर यांच्यासह रिनल पाषाणकर आणि दीप पुरोहित यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. 

पुण्यातील मोठ्या उद्योजकांच्या यादीत गौतम पाषाणकरांचं नाव आघाडीवर असतं. काही दिवसांपूर्वी पुण्यातून बेपत्ता झाल्यामुळं गौतम पाषाणकर चर्चेत आले होते. त्यांच्या घरी एक चिठ्ठीही ठेवली होती. जवळपास 20 ते 25 दिवसांनी पोलिसांनी बाहेरच्या राज्यातून त्यांना ताब्यात घेतलं आणि पुन्हा पुण्यात आणलं होतं. याप्रकरणानंतर गौतम पाषाणकर पुन्हा चर्चेत आले आहेत, ते फसवणूक केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामुळं.

गौतम पाषाणकर यांच्याविरोधात पसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. एका 43 वर्षीय व्यक्तीनं ही तक्रार दिली आहे. तक्रारदार व्यवसायिक आहेत. त्यांना फ्लॅट घ्यायचा होता. यादरम्यान गौतम पाषाणकर यांनी आर्थिक फायदा व्हावा, यासाठी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांना खरडीत सुरु असलेल्या मे. प्रोक्सिमा क्रिएशन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन या बहुमजली बांधकाम इमारतीमधील दोन फ्लॅट दिले. या फ्लॅटचा व्यवहार ठरला आणि करारनामा देखील झाला केला. 2 कोटी 87 लाख रुपयांना या दोन फ्लॅटचा व्यवहार ठरला होता. त्यांनी 2 कोटी 40 लाख रुपये घेतले. मात्र, फ्लॅटचा ताबा आणि नोंदणीकृत दस्तावेज तयार केले नाही. तर फ्लॅटचे खरेदीखत देखील त्यांच्या नावावर केलं नाही. हे दोन्ही फ्लॅट दुसऱ्याच दोन व्यक्तींच्या नावावर केले. 

सर्व बाबी लक्षात आल्यानंतर तक्रारदारांनी याबाबत पाषाणकरांकडे विचारपूस केली. त्यावेळी गौतम पाषाणकर यांनी जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या ऑफिसमध्ये त्यांना बोलावलं. तक्रारदार तिथे गेल्यानंतर आरोपी आणि त्यांच्या नोकरांनी त्यांना बेदम मारहाण केली, असा दावा तक्रारदारांनी केला आहे. या मारहाणीत पायही फ्रॅक्चर झाल्याचं तक्रारदारांनी सांगितलं. 

पुणे व्हिडीओ

Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Garam Masala Actress Nikita Rawal Viral Video: प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत हादरवणारं कृत्य, सेल्फी घेताना चाहतीकडून बळजबरीनं किस, जबरदस्तीनं ओठ चघळले अन्... VIDEO
प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत हादरवणारं कृत्य, सेल्फी घेताना चाहतीकडून बळजबरीनं किस, जबरदस्तीनं ओठ चघळले अन्... VIDEO
Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Horoscope Today 10 August 2026 : आज सोमवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा; 'या' राशींना सावधगिरीचा इशारा; वाचा आजचे राशीभविष्य
आज सोमवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा; 'या' राशींना सावधगिरीचा इशारा; वाचा आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
Embed widget