Pune Porsche Accident : पुणे ब्लड सँपल प्रकरणात दुपारपर्यंत निलंबनाची शक्यता
Pune Porsche Accident : पुणे ब्लड सँपल प्रकरणात दुपारपर्यंत निलंबनाची शक्यता
अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी विशाल अगरवालचे डॉ. तावरेला तब्बल १४ फोन कॉल, रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात नवी माहिती तर पोलिसांकडून डॉ.तावरे आणि डॉ. हळनोर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव
पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. अपघाताची घटना 'एआय'द्वारे जिवंत करण्यात येणार आहे. डिजिटल पुराव्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. रॅश ड्रायव्हिंग अपघातातील दोषीला कडक शिक्षा व्हावी, यासाठी तांत्रिक पुरावे गोळा करण्यावर पोलीस भर देत आहेत. 'एआय'मधील तज्ज्ञांसह वाहन आणि रस्ते वाहतुकीशी संबंधित केंद्रीय संस्थांची मदत घेतली जाणार आहे
पुणे ससून हॉस्पिटल प्रकरणी गुन्हे शाखेकडून पकडलेल्या डॉ. अजय तावरे, डॉ.श्रीहरी हळणोर आणि शिपाई अमित घटकांबळे यांची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. अतुल घटकांबळे याच्याकडून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 50 हजार रुपये जप्त केले, तर दुसऱ्या बाजूला डॉ. श्रीहरी हळनोर यांच्याकडून 2.5 लाख रुपये जप्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे. आता ही रक्कम कोणी घटकांबळेला कोणी दिली? याचा शोध सुरू आहे.