Pune APMC : पणन कायद्यातील दुरूस्तीविरोधात पुणे बाजारसमितीचा एक दिवसीय लाक्षणिक बंद
Pune APMC : पणन कायद्यातील दुरूस्तीविरोधात पुणे बाजारसमितीचा एक दिवसीय लाक्षणिक बंद पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कामगार संघटना बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत. माथाडी कायद्याची राज्यभरात काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसेच बाजार समितीचे केंद्रीकरण करणारे २०१८ चे विधेयक (राष्ट्रीय दर्जा बाजार समिती बनविणे) मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी कामगार संघटनांनी राज्यातील सर्व बाजार समित्यांमधील कामकाज बंद ठेवण्यात आल आहे. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कामगार संघटना बंदमध्ये सहभागी झाले असून आज सकाळपासून यार्डातील कामकाज बंद ठेवण्यात आले आहे तसचं शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीस पाठवू नये, असे आवाहन देखील बाजार समिती कडून करण्यात आलं आहे. पुण्यातील मार्केट यार्ड आज सकाळपासूनच बंद असल्यामुळे या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळतोय. या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी...